Skip to content

आंतरवर्ग प्रशिक्षण

पोलिस प्रशिक्षण केंद्र धुळे हे महाराष्ट्र पोलिसांच्या १० प्रशिक्षण केंद्रांपैकी एक प्रशिक्षण केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस आयुक्तालये व जिल्हा पोलीस दल यामध्ये नव्याने भरती झालेल्या पोलीस कॉन्स्टेबल यांना मूलभूत प्रशिक्षण (फाउंडेशन कोर्स) देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना ०९ महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात येते. पोलिसांच्या प्रभावी कामकाजासाठी आवश्यक विविध पोलिसिंग कौशल्ये शिकवणे हे प्रशिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

आंतरवर्ग प्रशिक्षण हे सकाळच्या सत्रात आयोजित केले जाते. त्यांना भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम, लघु कायदे, सायबर गुन्हे, कायदा आणि सुव्यवस्था हाताळणी, एफआयआर नोंदणी, पंचनामा, सायबर फॉरेन्सिक्स, पुराव्याचे संकलन, तपास, गुन्हे प्रतिबंध, पोलिस व जनता संबंध, फॉरेन्सिक सायन्स, संगणक मूलभूत गोष्टी, सीसीटीएनएस (गुन्हे आणि गुन्हेगारी ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम), बोटांचे ठसे इत्यादी विषय शिकवले जातात.

पोलिसांचा समाजाकडे पारंपारिक पणे पाहण्याचा दृष्टिकोन आजकाल पुरेसा नसल्याने भावनिक प्रज्ञा यांसारखे विविध विषय त्यांना तक्रारदार, कुटुंब आणि संपूर्ण समाजाकडे अधिक दयाळू दृष्टिकोन ठेवण्यास मदत करत आहेत व त्यांना कार्य कुशल बनवीत आहेत.

Sr.NoNameDesignation
1.विकास वाघपोलीस निरीक्षक
2.सुनील वसावे पोलीस निरीक्षक
3.देवयानी पाटील पोलीस निरीक्षक
4.राजेंद्र मोरेपोलीस निरीक्षक
5.राहुल फुला पोलीस निरीक्षक
6.संतोष शिंदे पोलीस निरीक्षक
7.आय एम सय्यदपोलीस निरीक्षक