परिचय
पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे हे महाराष्ट्रातील निरनिराळया जिल्हयातुन पोलीस दलात प्रवेश करणाऱ्या पोलीस शिपाई यांना मुलभूत प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासन निर्णयानुसार दि.16 एप्रिल 2010 पासून सुरु करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण केंद्रात आजपर्यंत 882 कवायत निदेशक यांना 12 सत्रात यशस्वी प्रशिक्षण देण्यात आलेले असुन सदर कवायत निदेशक हे महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस प्रशिक्षण संस्था येथे व घटकात नव्याने नियुक्ती व भरती झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वाह्यवर्गाचे उत्कृष्ट प्रशिक्षण देवुन सक्षम अधिकारी व अंमलदार घडवित आहेत.
या संस्थेत आजपावेतो 924 नवप्रविष्ठ महिला पोलीस शिपाई व 2190 पुरुष पोलीस शिपाई असे एकुण 3114 महिला व पुरुष प्रशिक्षणार्थीयांनी मुलभुत प्रशिक्षण घेतले आहे. तसेच 1035 नवप्रविष्ठ पुरुष व महिला, होमगार्ड यांनी राज्याच्या विविध घटकातून पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे येथे येवून मूलभूत प्रशिक्षण घेतले आहे. व पोलीस उपनिरीक्षक इंडक्शन कोर्स प्रशिक्षणाकरीता राज्यातील विविध घटकातुन एकुण 1821 पोलीस उपनिरीक्षक यांना तसेच 10-वर्ष व 20 वर्ष पोलीस दलात सेवा झालेले पोलीस अंमलदार यांच्या करीता प्रोफेशनल स्कोल अपग्रेडेशन, प्रशिक्षण एकुण 2035 प्रशिक्षणार्थीना कायदयाचे ज्ञान व प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले आहे असे एकुण आजपावेतो 8887 प्रशिक्षणाधीना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्व प्रशिक्षणार्थी मेहाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलात वेगवेगळ्या घटकांमध्ये आपली कामगिरी उत्तमपणे वजावुन महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा संपूर्ण देशात अभिमानाने उंचावित आहेत.