Happy Visitors Dot Com
Posts by Amol Mirje:
बार्बर,टेलर,मोची
नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे बार्बर टेलर आणि मोची यांची शॉप उपलब्ध करून देण्यात आले आहे जेणेकरून त्यांच्या अडीअडचणी वेळोवेळी सोडविण्यास मदत होईल.
वसतीगृह
पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथील नवप्रविष्ठ पोलीस शिपाई यांना आरामाकरिता पांजरा वसतिगृह व तापी वसतिगृह या दोन वसतिगृहांची निर्मिती करण्यात आली आहे ज्यामध्ये मुलांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरविण्यात आले आहेत जेणेकरून नवप्रविष्ठ प्रशिक्षणार्थी यांना कुठल्याही समस्येस सामोरे जावे लागणार नाही यावर भर देण्यात आला आहे.
अधिकारी वसतिगृह
अधिकारी वसतिगृह ही पोलीस प्रशिक्षण केंद्रातील महत्त्वाची निवासी सुविधा आहे. प्रशिक्षण काळात किंवा अधिकृत कामकाजादरम्यान येणाऱ्या विविध दर्जाच्या अधिकाऱ्यांना सुरक्षित, सोयीस्कर आणि सुसज्ज राहण्याची व्यवस्था येथे केली जाते.
उपप्राचार्य निवासस्थान
उपप्राचार्य निवासस्थान हे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील वरिष्ठ अधिकारी वर्गासाठी उपलब्ध करून दिलेल्या महत्त्वाच्या सुविधा पैकी एक आहे. यामुळे उपप्राचार्यांना केंद्र परिसरातच राहून आपली शैक्षणिक व प्रशासकीय जबाबदारी प्रभावीपणे पार पाडता येते.
प्राचार्य निवासस्थान
प्राचार्य निवासस्थान ही पोलीस प्रशिक्षण केंद्रातील एक महत्त्वाची सुविधा आहे. केंद्राचे प्रमुख असणाऱ्या प्राचार्यांना सुरक्षित, सुसज्ज व आरामदायी निवासाची व्यवस्था येथे उपलब्ध करून दिलेली असते.
आयुधिक कार्यशाळा
आयूधिक कार्यशाळा येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथील सर्व प्रकारच्या तांत्रिक बिघाड झालेल्या वस्तू सुरळीत करून त्यांची देखभाल केली जाते.
शुध्द जलसाठा
पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थ शिपाई यांना शुद्ध पाणी जलसाठा याची निर्मिती करण्यात आली आहे जेणेकरून मुलांना RO चे शुद्ध पाणी मिळावे यासाठी पूर्ण दक्षता घेण्यात आली आहे आरोचे शुद्धीकरण वेळोवेळी करून मुलांना रोगराई पासून दूर ठेवण्याचे व शुद्ध पाणी मिळावे याची दक्षता घेतली जाते.